कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते. कोकमचे फळ हे गोवा आणि गुजरात येथे सर्वाधिक आढळते. हे एक रसदार फळ आहे जे शरीराच्या उष्णतेला थंडावा देते. या फळांची साले सुकवून ठेवली जातात. कोकमाचा वापर डाळ, भाजीमध्ये प्रामुख्याने केला जातो. कोकम चिंचेप्रमाणे आंबट असते.
कोकम सरबत बनवण्याची कृती: कोकम ५ ते १०, ५० ग्रॅम साखर, काळे मीठ, जिरे पावडर, कोकम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कोकमचे पाणी चांगले एकजीव करून घ्या. यात साखर, काळे मीठ आणि जिरेपूड टाकून व्यवस्थित मिक्स करा.
जाणून घ्या कोकमचे फायदे: कोकम सरबताच्या सेवनाने चयापचय क्रिया चांगल्या पद्धतीने काम करते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते. कोकमच्या फळामध्ये व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिडयासोबतच अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते. कोकमच्या फळात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करण्यात मदत करतात. याशिवाय तुम्हाला हेल्दी बनवतात. कोकमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असते. कोकमामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स अजिबात नसते. कोकममध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो आणि आम्लपित्त कमी करण्यासाठीही कोकम सरबत अत्यंत उपयोगी आहे.

0 Comments