आपला देश बॉलिवूड चित्रपटाचा निर्माण कर्ता आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? बॉलीवूड शिवाय देशात खूप अशा चित्रपट सृष्टी आहेत. येथे खूप साऱ्या चांगल्या चित्रपटाची निर्मिती होते. अशाच काही चित्रपट सृष्टी साउथ मध्ये आहेत. साउथच्या बऱ्याच चित्रपटाचे फॅन आहेत. रजनीकांत आणि कमल हसन ह्यासारखे गुणवंत अभिनेता आपल्याला साउथच्या चित्रपटसृष्टीने दिलेले आहेत. हे झाले अभिनेत्यांबाबत परंतु साऊथ च्या अभिनेत्री पण काही कमी नाहीत. तर चला मित्रांनो मराठी लव्ह स्टोरीजच्या आजच्या या आर्टिकल मध्ये आपण माहिती घेणार आहोत अशाच साउथ अभिनेत्रींबद्दल ज्या बॉलिवूड अभिनेत्री पेक्षाही जास्त पैसे घेतात.
हंसिका मोटवानी साउथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच त्यांनी टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘ शाका लाका बूम बूम’ या सिरीयल मध्येही चाइल्ड ॲक्टर म्हणून काम केले आहे. हंसिका यांनी तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. यांनी बिल्ला, मस्का, समथिंग समथिंग या चित्रपटांमध्येही काम केले आहे. हंसिका आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 80 लाख रुपये एवढे पैसे घेते.
नंबर एक – अनुष्का शेट्टी
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? साउथच्या चित्रपट सृष्टीतील सर्वात आवडती अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. अनुष्काच्या चित्रपटातील कामाची सुरुवात 2005 मध्ये झाली. आत्ता पर्यंत अनुष्काने तीस पेक्षाही जास्त तेलगू आणि तमिळचित्रपटात काम केले आहे. अनुष्का साऊथ मधील पिक्चर मध्ये काम करण्यासाठी जास्त पैसे घेणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे. ती आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी चार करोड रुपये एवढे पैसे घेते. अनुष्काने विक्रमकुडा, रुद्रमादेवी, बाहुबली पार्ट 1 आणि बाहुबली पार्ट 2 यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नंबर 2- नयनतारा
अभिनेत्री नयनतारा यांचे लहानपणचे नाव डायना मरियम कुरियन होते. चेन्नईचा एका आर्य समाज मंदिरामध्ये नयनतारा ने हिंदू धर्म स्वीकारून आपले नवीन नाव नयनतारा असे ठेवले. हे साऊथ मधील सर्वात जास्त पैसे घेणारी नंबर दोनची अभिनेत्री आहे. या आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी अडीच ते तीन करोड रुपये एवढे पैसे घेतात. नयनतारा यांनी तमिळ ,तेलुगू, कन्नड, आणि मल्याळम या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नयनतारा यांनी वल्लवण, तुळसी, सिंबा, राजाराणी, माया यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नंबर 3- तमन्ना भाटिया
सुपरहिट चित्रपट बाहुबली पार्ट 1 मध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री तमन्ना भाटिया खूप प्रसिद्ध झाली. लोकांनी त्यांच्या कामाला पसंती दाखवली आहे. प्रत्येक चित्रपटासाठी तमन्ना दोन ते तीन करोड रुपये एवढे पैसे घेते. तमन्नाचा पहिला तेलगू चित्रपट श्री आणि पहिला हिंदी चित्रपट ‘ चांद सा रोशन चेहरा’ 2005 मध्ये आला होता. तमन्नने तीन भाषांमध्ये कमीतकमी साठ चित्रपटात काम केले आहे.
साऊथ ची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभु आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी कमीत कमी दोन ते अडीच करोड रुपये एवढे पैसे घेते. समंथा तेलगू आणि तमिळ चित्रपट सृष्टीतील ओळखीचा चेहरा आहे. त्यांनी लगातार तीन चांगल्या चित्रपटांमध्ये काम करत लोकांमध्ये आपली एक वेगळीच छाप बनवली आहे. त्याचबरोबर समांथा रुथ प्रभु प्रत्युषा सपोर्ट नावाचे एनजीओ पण चालवतात. त्याद्वारे त्या महिला आणि मुलांच्या आरोग्यासंदर्भात सेवा पुरवतात.
नंबर 5- काजल अगरवाल
काजल अग्रवाल साऊथ मधील सर्वात सुंदर अभिनेत्री पैकी एक आहेत. त्यांनी तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील बर्याचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी दोन करोड रुपये एवढे पैसे घेतात. काजल यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2004 मध्ये आलेल्या ‘ क्यू हो गया ना’ या हिंदी चित्रपटाने केली होती. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी पहिला तेलगू चित्रपट ‘ लक्ष्मी कल्याणम’ यात काम केले होते. काजल यांच्या करिअरचा सर्वात सुपरहिट चित्रपट होता ‘ मगधीरा’.
श्रुती हसन या सुंदरतेमुळे आणि आपल्या आवाजामुळे प्रसिद्ध आहेत. ती एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच एक चांगली गायिका पण आहे. श्रुती साउथ चे सुपरस्टार कमल हसन आणि बॉलिवूड अभिनेत्री सारिका ठाकूर यांची मोठी मुलगी आहे. त्यांनी तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. श्रुती हसन या एका चित्रपटासाठी दीड करोड रुपये एवढे पैसे घेतात.
नंबर 7- रकुल प्रीत सिंग
रकुल प्रीत सिंग यांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमधील बर्याचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. रकुल प्रीत सिंग यांनी 2009 मध्ये कन्नड मधील ‘गिल्ली’ या चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याची सुरुवात केली. त्यांनी विनर, यारीया यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
श्रिया सरन यांनी आपला पहिला चित्रपट 2001 मध्ये तमिळ भाषेतील ‘इस्तलाम’ केला होता. त्यांनी तमिळ मध्ये ‘शिवाजी’, ‘कांथास्वामी’ हिंदीमध्ये ‘आवारापण’ यामध्येही काम केले आहे. श्रिया सरण आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी एक करोड रुपये इतके पैसे घेतात. याचबरोबर श्रिया सरण सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या ब्रँड अँबेसिडर आहेत.
त्रिषा कृष्णन एक प्रसिद्ध भारतीय मॉडल आणि अभिनेत्री आहे. यांनी तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्या आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी कमीत कमी 9000000 एवढे पैसे घेतात. त्रिषा कृष्णन यांनी ‘ खट्टा मीठा ‘ या हिंदी चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
नंबर 10- हंसिका मोटवानी


0 Comments