स्त्री- लग्नाआधी आणि लग्नानंतर

एक दिवस बाबा म्हणाले एक छान स्थळ आलंय, बघायचं का? आई ने लगेच होकार दिला पण मी म्हणाली मला थोडा वेळ हवाय. मग लगेच घरातल्याची समजावणे सुरु झाले की आताच कुठे लग्न करायचं आहे, पाहिलंच स्थळ आहे, कशाला नाही म्हणायचं. मुलगा बघून तर घे बाकी बघू पुढचं पुढे. असे करत करत शेवटी बघायचा कार्यक्रम ठरला. दोन्ही कडच्या मंडळींनी आपसात चर्चा करून वर कार्यक्रमाची आखणी केली आणि ठरल्या वेळी ठरल्या जागी अगदी रीतसर पद्धतीने कांदे पोह्याचा कार्यक्रम सुरु झाला. मला तर तो बघताक्षणीच आवडला होता. जास्त मोकळीक न मिळाल्याने आमचं तसं फार काही बोलणं नाही झालं, पण त्याच्या नजरेतून मला जाणवलं की मी पण त्याला आवडले होते. पण तरी शेवटी त्यांचा होकार येई पर्यंत वाट बघणं भाग होता. 
कशी तरी मी रात्रं काढली न सकाळी माझी माझ्या कामाला लागली. डोक्यात कुठेतरी तो होताच. शेवटी त्यांचा फोन आला बाबांना आणि त्यांनी पसंती देऊन "तुम्ही मुलीची पसंती तिला विचारून कळवा" असे ते म्हणाले. आई बाबांनी मला जेव्हा माझा मत विचारलं तेव्हा "मी काय तुमच्या शब्दा बाहेर आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं करा" असं म्हणून मी माझा छुपा होकार त्यांना सांगितला. दोनीही कडले होकार कळवून झाल्यावर साखरपुड्याची तारीख ठरली. घरी साखरपुड्याची गडबड सुरु झाली. बघता बघता साखरपुडा झाला न लग्नाची तारीख पण निघाली. जशी जशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी घरी लग्नाच्या कामाची वाटणी आणि आखणी होऊ लागली, आप्तेष्टांकडून केळवनाची आमंत्रणं येऊ लागली. आम्ही दोघं पण आयुष्यातली हि वेळ मस्त enjoy करत होतो. कधी व्याही भोजन तर कधी कपडा खरेदी असे एक ना अनेक बहाणे काढून आम्ही भेटायचो. लग्नाच्या पंधरा दिवस अगोदर पासून घरी पाहुणे येणे सुरु झाले न हळू हळू पूर्ण घर पाहुण्यांनी गजबजून गेलं. मांडव सजला, हळद लागली, देवक बसलं आणि सगळ्या वर्हाडी मंडळींची पावलं DJ च्या तालावर थिरकायला लागली. मेंदी काढली न नवऱ्याच्या नावाचा हिरवा चुडा भरला. चुडा भरण चालू असतांना माझी आणि आईची नजरानजर झाली आणि दोघींच्या पण डोळ्यात टचकन पाणी आलं. लग्न २ दिवसांवर येऊन ठेपलं. दिवसभराच्या कामांनी थकून घरचे सगळे पटापट जेवण करून झोपी गेले आणि घर शांत झालं. पण मला काही झोप लागत नव्हती. काही वेळात घरात वेगळाच गोंगाट सुरु झाला, आता तो सगळ्यांच्या घोरण्याचा होता. आणि माझ्या मनात वेगळाच गोंगाट चालू होता. सासरची ओढ विरुद्द माहेरचा विरह जणू अशी जुगलबंदीच चालु होती. एकी कडे सासर चे नवीन घर तिथले लोक न 'तो' त्याचा सहवास (मला हवाहवा वाटणारा) या सगळ्या विचारांनी एकदम मंद वाऱ्याची झुळूक लागल्या सारखं वाटत होतं आणि दुसरी कडे आता २ दिवसांनी माझ्या माहेरच्या घराला, माणसांना सोडून जावं लागणार. एवढे दिवस जे सगळं माझं होतं ते आता सोडावं लागणार. मला लहानपण जितकं जितकं आठवतं तितक तितकं सगळं, आम्हा बहिणींचे भांडणं, आमचे रुसवे-फुगवे, आम्ही केलेली मज्जा माझ्या डोळ्यांसमोरून जात असल्याचं मला जाणवत होतं. माझं घर, नाव, ओळख सगळं बदलणार होतं. आज पर्यंत मी मुलगी होती, बहीण होती, नात होती पण आता मी नवीन आयुष्यात पदार्पण करणार होती. कुणाची तरी पत्नी, कुणाची सून, कुणाची वहिनी होणार होती. या सगळ्याची मला ओढ पण होती आणि एक अनामिक भीती पण! आपल्याला मोठं असल्यानी हक्क गाजवायच मज्जा येईल असं वाटायचं न त्याचवेळी तिथे आपल्यावर पण कोणी हक्क गाज्वेल याचं पण मला थोडा धाक वाटत होता. विचारचं काहूर थोडं शांत झाल्यावर मी जेव्हा भानावर आली तेव्हा मग पुन्हा झोपण्याचा प्रयत्न फसला मग मात्र मी अंथरुणातून उठली न पाणी प्यायला किचन कडे निघाली जाता मधेच माझी नजर भिंतीवर एका ठिकाणी खिळली. माझी न बाबांची फोटो फ्रेम होती ती. तिच्या कडे बघता बघता नकळत कधी माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागला माझा मलाच नाही कळलं. आठवत नाही मी किती वेळ त्या फ्रेम कडे बघत होती. शेवटी जेव्हा भानावर आली तेव्हा घड्याळाकडे नजर गेली न वेळ बघून आता झोपावं नाही तर सकाळी उठायला कंटाळा येईल असा विचार करतच होती की आईला जाग आला न तिनी झोपायला जवळ बोलावलं. कदाचित तिला माझी स्थिती कळाली असेल. मलापण तिच्या कुशीत एकदम शांत झोप लागली तीपण अगदी थोडाच वेळात.  सकाळी आईनी नेहमी पेक्षा एकदम वेगळ्या आवाजात उठवलं. मला तिचा तो आवाज आवडला पण न आवडला नाही पण. आवडला यासाठी कि आईनी मला एवढा प्रेमानी झोपेतून कधीच नाही उठवलं. आणि आवडला नाही यासाठी कि तिच्या त्या आवाजामध्ये मला परका भास झाला. विचार थांबवून मी तयारीला लागली. आज कार्यालयात जायचं होतं. सगळं आवरून होई पर्यंत कार्यालयात जायच्या गाड्या दारात आल्या. निघण्या अगोदर मी एकदा देवघरात गेली, देवापुढे हात जोडले आणि फक्त एक गोष्ट मागितली, माझ्या दोन्ही घरांना असच सुखाने बहरू दे. गाडीत बसल्यावर माझा लक्ष बाबांकडे गेलं, त्यांच्या व चेहेऱ्यावर त्यांच्या मनातल्या भावांचं प्रतिबिंब उमटल्यासारखं वाटलं. आपल्या पोटची मुलगी एका अनोळखी मुलाला जन्मभरासाठी देतांना बापाची काय अवस्था होत असेल काय माहिती. त्यादिवशी, त्याक्षणी मला कन्यादान सगळ्यात श्रेष्ठ दान का आहे ते कळलं. हिंदीत म्हणतात ना 'बेटी धन कि पेटी'. तसं हे म्हणणं सोपं आहे पण ते एवढंसं वाक्य सगळ्यांना कळतंच असं नाही. लग्न आटोपले आणि संध्याकाळच्या वेळेस नवऱ्याचा हात धरून गृहप्रवेश झाला. नवीन सूनबाईच्या येण्यानी घर आनंदून गेलं होतं. या सगळ्यामुळे मला छान वाटत होता, पण त्यात भर पडत होती ती त्याच्या सहवासानी. आणि हि त्याच्या सहवासाचीच कमाल होती की मला सगळ्या पाहुण्यांमध्ये एकरूप व्हायला वेळ नाही लागला. फार थोड्या वेळेत त्या घरानी आणि घरातल्या लोकांनीं मला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. मग हळू हलू दीर, नणंद, जाऊ यांच्या सोबत असलेली निव्वळ ओळख आता गट्टी बनली. वेणी गुंफताना एक एक फुल माळवे तस घरातले एक एक व्यक्ती माझा जीवनरूपी वेणी मध्ये गुंफत गेले.


लग्ना अगोदर मी ह्यांच्याकडून ("त्याला" एव्हाना मी "अहो" म्हणायला सुरवात केली होती) सासूबाई सुगरण आहेत असं ऐकलं होतंच पण आत हळू हळू मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत होता. रोज काही ना काही नवीन पदार्थ मला शिकायला मिळत होते, आणि त्या पदार्थ शिकण्यापेक्षा मला ह्यांच्या आवडी निवडी कळत होतं ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं. सासूबाईंना माझी शिकण्याच्या आवडीचं कौतुक वाटत होत. नवऱ्याची लाडकी बायको आता सासू-सासऱ्यांची लाडकी सुनबाई होत होती. असच एक दिवस मला ती रात्र आठवली, पण आता त्या रात्री वाटलेली भीती नव्हती, कारण आता त्या भीतिची जागा इथल्या लोकांकडून भभरून भेटलेल्या प्रेमानी घेतली होती. हळू हळू त्या रात्रीची मनातली उलथापालथ सकारात्मकतेत बदलत गेली. हे सगळं घडण्यामध्ये ह्यांचा मोलाचा वाटा आहे. तो फक्त माझा नवराच नाही तर एक खूप छान मित्र आणि मार्गदर्शक पण बनला.
सासरी लग्नानंतर माझे सगळे सण साजरे झाले अगदी डोहाळेजेवणापासून ते मुलाच्या बारस्या पर्यंत. खरंच मुली चे कोडकौतुक करण्यासारखं सासर मिळण्यासाठी नशीब असावं लागतं आणि सुनेचे कौतुक सोहळे करण्यासाठी मोठं मन असावं लागतं. आता लग्नाच्या एवढ्या वर्षा नंतर कधी कधी ती रात्र ती मनातली हुरहूर आठवली कि वाटते लग्नाआगोदर माझं आयुष्य छान होतचं पण आता त्याला अजून नवीन आयाम मिळाले. बाई होऊन सगळी नाती जपून संसार करायला सगळीकडून झीजावं लागतं. पण म्हणतात ना हिरा जेवढा झिजेल तेवढाच तो अजून लखाकतो. 🙏🙏समस्त स्त्रियांना समर्पित🙏🙏

Post a Comment

0 Comments