प्रेमामधली समजूत एक खरी प्रेम कहाणी

मी माझ्या फॅमिलीसोबत 12 मार्च 2018 ला लातूरला आमच्या एका पाहुण्याच्या लग्नाला गेलो. लग्नामध्ये एक खूपच सुंदर मुलगी दिसली, बघता क्षणी माझ्या हृदयात घंटी वाजली. लग्नामध्ये मी तिलाच फॉलो करत होतो, ती जेवायला बसली, तिने पहिल्यांदा बर्फी खाल्ली आणि तिच्या प्लेट मधली बर्फी संपली. हे पाहून मी लगेच तिच्या पंगती मध्ये बर्फी घेऊन गेलो आणि तिला 4 बरफ्या वाढलो ती म्हणाली एवढ्या बरफ्या नको. मी म्हणालो काही होत नाही खा... थोड्यावेळाने तिचं जेवण झालं. मग मी आणि माझे मित्र जेवायला बसलो, आमचं पण जेवण झालं. मग माझे डोळे तिलाच शोधत होते, ती दिसली आणि मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला कारण की ती माझ्या आत्याला बोलत होती. मग थोड्यावेळाने मला समजलं की ती मुलगी माझ्या आत्याची दूरची नातलग आहे.       
सायंकाळचे 6 वाजले होते आम्ही परत उदगीरला येण्यासाठी निघालो, आमच्या गाडीमध्ये बरीच जागा शिल्लक होती तर आत्यानी त्या मुलीच्या आई वडिलांना सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला सोडू. ते पण येण्यासाठी तयार झाले, गाडी क्रुजर होती. माझे पप्पा आणि तिचे पप्पा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वर बसले, माझी मम्मी तिची मम्मी माझी ताई आणि आत्या मधल्या सीटवर, आणि मी आणि ती शेवटी बसलो, क्रुजर मध्ये शेवटी प्लायवुड आणि गादी टाकलं होतं कारण लग्नाला जातेवेळी आम्ही काचेचे समान घेऊन गेलो होतो. 
गाडी निघाली मी माझ्या कानामध्ये हेडफोन लावलो आणि मस्त गाणे ऐकत बसलो. थोडयावेळाने ती मला काहीतरी इशारा केल्याच जाणवलं मी कानातील हेडफोन काढलो आणि विचारलो काय? तर ती म्हणाली तुझ्याकडे jio आहे का? मी म्हणालो हो, तर ती म्हणाली थोडावेळ हॉटस्पॉट चालू करशील? मी लगेच हॉटस्पॉट चालू केलो आणि तिला तिचं नाव विचरलो, तिचं नाव होतं साक्षी तिने पण मला माझं नाव विचारलं मी सांगितलो माझं नाव आकाश. मी लगेच तिला विचरलो तू फेसबुक वर आहेस का तर ती म्हणाली हो, असच आम्ही बोलत होतो मी तिला facebbok वर search करून friend request पाठवलो. तीन accept पण केली माझी request, तिच्या facebook profile वर लिहिलेल होतं की lives in नाळेगाव. मग मी विचरलो तू नाळेगाव मध्ये राहतेस ती म्हणली हो. काय करतेस म्हणजे education? तर ती म्हणाली bsc agri मी ठीक आहे म्हणलो. असच बोलत बोलत नाळेगाव आलं ती आणि तिचे आणि वडील उतरले मी मागे एकटाच होतो. रात्री 9:30 वाजता आम्ही उदगीरला पोहचलो. दुसऱ्यादिवशी सकाळी मी फेसबुकवर तिचा प्रोफाइल चेक केलो तर असं माझ्या लक्षात आलं की तिचा कोणी बॉयफ्रेंड वैगरे नाही. आम्ही रोज फेसबुक वर बोलायचो. आमची दुसरी भेट 2 एप्रिल 2018 रोजी उदगीरमध्ये झाली. ती तिच्या कोणत्या तरी पाहुण्याच्या लग्नाला आली होती आणि तिनं मला पण लग्नला बोलवलं, त्या दिवशी मस्त पैकी आम्ही खूप गप्प मारल्या. आमचं मस्त चाललं होतं. 16 एप्रिलला घरामध्ये चर्चा झाली की अजय साठी मुलगी पाहायचं आहे (अजय हा माझ्या आत्याचा मोठा मुलगा) आणि 20 एप्रिलला नाळेगावला त्या पाहुण्याकडे मुलगी पाहायला जायचं आहे. मी खूप खुश झालो कारण माझी आणि साक्षी ची  तिसरी भेट होणार होती, लगेच मी रात्री साक्षीला whatsaap वर संगीतलो आपली लवकरच भेट होईल.                                 

दुसऱ्यादिवशी ती ऑनलाईनच आली नाही, तिसरही दिवस तसाच गेला ती काही ऑनलाईन आली नाही. last seen 16 april 2018 at 11:54 pm. 19 तारखेला वाटलं तिला कॉल करून सांगावं की मी उद्या नाळेगावला येतोय पण माझ्या मनामध्ये आलं की उद्या प्रत्येक्ष भेटूनच तिला surprise द्यावं. आम्ही नाळेगवला गेलो त्या घरी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते घर साक्षीचच घर आहे कारण त्या घरामध्ये भिंतीवर साक्षीचे फोटो वगैरे लावलेले होते. घरामध्ये साक्षीची आई दिसली तिचे वडील पण दिसले पण साक्षी काही दिसली नाही. थोड्या वेळाने साक्षी पोह्याचा ट्रे घेऊन आली ती सर्वांना पोहे दिली, माझ्याकडे पाहिली पण नाही. पोहे देऊन ती समोरच्या खुर्चीवर बसली, ती खुर्चीवर बसल्यानंतर तिच्या वडिलांच्या तोंडातून आलेले ते शब्द, "बघून घ्या पाहुण आमची साक्षी" माझं काळीज आता फटातच चाललं होतं. माझ्या अत्याचा मुलगा तिला प्रश्न विचारत होता शिक्षण, वय, छंद. तिच्या वडिलांनी विचारले आवडली का आमची साक्षी माझ्या आत्याचा मुलगा मामाच्या कानामध्ये काहीतरी बोलला तर लगेच मामा म्हणाले आम्हाला मुलगी पसंद आहे आपण लगेच सुपारी फोडू. (इथं माझं काळीज फुटायला आला होतं.) तितक्यात साक्षी चे वडील म्हणाले मुलाला आणि मुलीला काही एकांतात बोलायचं असेल तर त्यांना बोलू द्या. मी माझ्या मामाच्या मुलाला म्हणलो आपण बाहेर  एखाद्या जूस सेंटर मध्ये जाऊयात मी ड्रायव्हर कडून गाडीची चवी घेतलो( या वेळेस आम्ही स्वतःची स्कॉर्पिओ आणलो होतो) मी गाडी चालवत होतो साक्षी आणि माझ्या आत्याचा मुलगा अजय मागे बसले होते. मी म्हणलो नाळेगाव मध्ये तेवढे छान हॉटेल नाहीत आपण आष्टामोडला जाऊयात. गाडी आष्टामोडच्या दिशेने जात होती अर्ध्या रस्त्या मध्ये साक्षी रडायला लागली अजय विचारला काय झालं ती म्हणाली गाडी साईडला घे मी गाडी साईडला घेतलो, माझा पण हंबरडा फुटला मी पण रडायला लागलो अजय ने विचारलं काय झालं तुम्हा दोघांना, तर साक्षी आणखी रडायला लागली आणि म्हणाली आकाश मी माझ्या बाबांच्या निर्णयाच्या विरोधात नाही जाऊ शकत, माझे बाबाच माझ्या साठी सर्व काही आहेत. तिचं हे बोलणं ऐकून अजय ला आमचं सर्वकाही समजलं होतं. अजय मला म्हणाला मी या लग्नाला नकार देतो तुम्हींदोघांनी लग्न करून घ्या. मी म्हणालो हे आता शक्य नाही सुपारी फुटली आहे आणि जर आता तू नकार दिलास तर दोन्ही पण कुटुंबांची खूप बदनामी होईल. मी अजयचा हात माझ्या हातामध्ये घेऊन त्याला म्हणलो तू मला वचन दे की तू साक्षी वर खूप प्रेम करशील आणि तिला जपशील. हे ऐकल्यावर साक्षी खूप रडायला लागली आणि तिने माझा हात पकडला आणि म्हणली मी तुला वाचन देते की माझ्या पेक्ष्या सुंदर मुलीशी तुझं लग्न लावून देईन. एवढं बोलून आमचं शेवटचं बोलणं झालं. मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की जेंव्हा तुम्हाला नौकरी लागेल त्यावेळेसच प्रेम आणि लग्नाचा विचार करा म्हणजेच ते यशस्वी ठरेल. अजय आणि माझ्यात फरक एवढाच होता अजयला जॉब होता आणि माझं इंजिनिअरिंगच शेवटचं वर्ष होतं.

Post a Comment

0 Comments