आणि म्हणून अक्षय कुमारला पुरस्कार घेतल्यानंतर अपमान झाल्यासारखं वाटलं

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने दिल्लीमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. आणि त्याने यामध्ये त्याच्या आयुष्यातील एक मजेदार किस्सा सांगितला.जेव्हा अक्षय कुमार पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी गेला होता तेव्हा त्याला अपमान झाल्यासारखे वाटले होते. अक्षय कुमार हल्ली सारखाच चर्चेत असतो. मग ते भाजप सरकार समर्थनार्थ केलेलं ट्विट असो किंवा अमित शहांची घेतलेली मुलाखत असो. पुन्हा एकदा चर्चेत तो चर्चेत आलाय तो ज्या क्षणी अपमानित झाला, तो क्षण त्याने या कार्यक्रमात सर्वांसमोर सांगितला. जेव्हा अक्षय कुमार प्रसिद्धीच्या झोतात होता, तेव्हा त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारतानाचाच तो अपमानास्पद क्षण होता. त्या क्षणी तो अत्यंत खजील झाला होता. पुरस्कार वितरणावेळी अक्षयसोबत एक मुलगी बसली होती. या मुलीमुळेच त्याला खजिल व्हायला झाले होते. काय केलं त्या मुलीने असं की अक्षयला अपमानित झाल्यासरखे वाटले? राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावेळी अक्षयसोबत एक मल्याळम अभिनेत्री बसली होती. तिने अक्षयकडे बघून स्मितहास्य केलं व त्याला म्हणाली, सर मी तुमची खूप मोठी चाहती आहे. मी तुमचे अनेक चित्रपट बघितले आहेत. त्यावेळी अक्षयला खूप बरं वाटलं आणि आपल्या कामाचा अभिमान वाटला. त्यानंतर त्या अभिनेत्रीने त्याला विचारलं की, तुम्ही किती चित्रपटांत काम केलंय, त्यावर अक्षयने 135 असे उत्तर दिले. यानंतर अक्षयनेही तिला तिच्या कामाविषयी विचारले, तर जो पुरस्कार स्विकारण्यासाठी ती आली होती, तो तिचा पहिला चित्रपट असल्याचे तिने सांगितले. यावेळी मात्र अक्षयला शरमल्यासारखे झाले. तिने एकच चित्रपट केला आणि तिला पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तो म्हणाला, हे ऐकल्यानंतर माझीच मला लाज वाटली. हा क्षण माझ्यासाठी फार अपमानास्पद होता, असं तो सांगतो.

Post a Comment

0 Comments