आणि म्हणून या अभिनेत्रीने वयाची चाळीशी उलटल्यानंतर केलं लग्‍न.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने वयाच्या ४२व्या वर्षी  लग्न केले आहे. पूजाने गुपचुप लग्न केले आणि जेंव्हा लग्नाचे फोटो इंटरनेटवर शेअर केले तेंव्हा सगळीकडे चर्चा सुरु झाली. पूजाने एवढ्या उशीरा लग्न का केले? तेही कोणाला न सांगता. यावर तिने लग्न झाल्यानंतर मनमोकळ्यापणाने बोलली आहे. 
एका मुलाखतीमध्ये पूजाने सांगितले की, हो आम्ही लग्न केले आहे. मी आणि नवाबने दिल्लीमध्ये लग्न केले आहे. आमच्या लग्नात केवळ आमच्या परिवारातील सदस्य सहभागी होते.  माझे फ्रेंड्स मला विचारत होते की, मी एवढ्या उशीरा लग्न का केले? मी सामान्यपणे माझे जीवन जगत होते. तेंव्हा मला असे जाणवले की, हाच तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मी माझे बाकी आयुष्य घालवू शकते. यानंतर लग्न टाळण्याचे कोणतेच कारण नव्हते. आम्ही आर्य समाज मंदिरामध्ये लग्न केले.
पूजा आणि नवाब एकमेकांना पाच महिन्यापासून डेट करत होते. एवढ्या लवकर लग्नाचा निर्णय घेण्याचे पूजाने सांगितले की, मी नवाबला एकाच प्रोफेशनमध्ये ओळखत होते. आमची भेट एका कॉमन मित्राने करुन दिली. मला वाटते की, आम्ही परफेक्ट वेळी एकमेकांना भेटलो आहे. आमच्या काही सवयी मिळत्या-जुळत्या होत्या त्यामुळे आम्ही लवकर एकमेकाच्या जवळ आलो. पूजाने सांगितले की, ‘मी नेहमीच नवाबचा सन्मान करत होते आणि त्यांना लाइक करत होते. माझ्या मनात कुठे न कुठेतरी असे वाटत होते की, आमच्यामध्ये मैत्रीपेक्षा ही जास्त काही होऊ शकते. आमच्या काही सवयी एकसारख्या होत्या त्यामुळे आम्हाला एकमेकांना समजण्यास जास्त वेळ लागला नाही. मला आनंद वाटतो की, नवाब माझ्या परिवारातील व्यक्ती आहे.’

Post a Comment

0 Comments