या चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच सोडून गेले ऋषी कपूर, पहा त्यांचा कोणता चित्रपट शेवटचा आहे.

ऋषी कपूर हे त्या काळातील चॉकलेट हिरो म्हणून नावाजले जात होते. ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबई मध्ये चेंबूर येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कैम्पियन स्कुल मुंबई, येथे तर उच्च शिक्षण मेयो कॉलेज अजमेर येथे पूर्ण केले. ऋषी कपूर यांना 'चिंटू' या टोपण नावाने सुद्धा ओळखले जात असे. ऋषी कपूर यांचे लग्न 22 जानेवारी 1980 रोजी नीतू सिंघ यांच्याशी झाले, ते 5 वर्षांपासून नीतू यांना डेट करत होते. ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर जो सध्या ऋषी कपूरसारखाच बॉलीवूड मधील चॉकलेट हिरो आहे. तर मुलगी रिधीमा यांचे लग्न प्रसिद्ध उद्योगपती भारत साहनी यांच्यासोबत झाले आहे.
ऋषी कपूर यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्धल बोलायचे झाले तर, वडील कलाकार आणि दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना चित्रपट मध्ये कामही लवकरच मिळाले. 1970 मध्ये त्यांनी "मेरा नाम जोकर" या त्यांच्या वडिलांच्या चित्रपटामध्ये काम केले, या चित्रपटामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांचा बालपणीचा रोल केला होता. ऋषी कपूर स्वतः ऍक्टर म्हणून 1973 साली "बॉबी" या चित्रपटामधून झळकले होते. त्यांनी 1973 ते 2000 या कालावधीत 92 चित्रपटांमध्ये रो-मँटिक हिरो म्हणून अभिनय केलेला आहे. ऋषी कपूर यांनी त्यांची पत्नी नीतू कपूर यांच्यासोबत 12 चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि सोलो लीड ऍक्टर म्हणून त्यांनी 51 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1998 मध्ये त्यांनी "आ अब लौट चलें" या चित्रपचे दिग्दर्शनही केले आहे. बॉबी, बारूद, नया दौर, सरगम, दो प्रेमी, कर्ज़, नसीब कुली, दुनिया, चांदनी, हम दोनों असे भरपूर चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत. "द बॉडी" हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे, तर "शर्माजी नमकीन" या चित्रपटाचे गझियबादमध्ये नुकतेच शूटिंग सुरू झाले होते. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि जुही चावला हे मुख्यभूमीक करत करत होते. ऋषी कपूर यांच्या अकाली निधनामुळे या चित्रपटाचे काय होणार हे आता दिग्दर्शक हितेश भाटिया यांनाच माहीत.

Post a Comment

0 Comments