आज तिला सकाळ सकाळी त्याचा मेसेज आला,"फ्री झालीस की कॉल कर" ती खुश होती आज ,सारी काम आटोपून पटकन तिने फोन केला आणि फोनवरचे बोल एकूण तिला काळजाचे तुकडे झाल्यागत झाले.त्याचं म्हणणं होतं तिन फक्त आणि फक्त त्याची समजूत काढण्यासाठी त्याच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला होता, तिला अस वाटत होतं की निघून जावं त्याच्या आयुष्यातून म्हणजे तिचा त्रास तिच्या मागची कटकट कमी होईल. तो सहज म्हणून गेला पण त्यापुढे तीन केलेल्या मैत्रीची काहीच किंमत नाही राहिली. बरोबर तीन वर्षापूर्वी त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली होती.त्यांची मैत्री हळूहळू खुलत होती.एकाच शाळेत दहावी पर्यंत ते शिकत होते. शाळेत कधी बोलणं नव्हतं झालं. ती सहसा मुलांबरोबर बोलत नसे,जुन्या विचारांची होती असाही नाही. दिसायला देखणी कोणालाही आवडेल अशी होती ती. तो पण हिरो पेक्षा कमी नव्हता, दिसायला सावळा असला तरी देखणा उंचापुरा होता.ती एकत्र कुटुंबामध्ये वाढलेली, घरच्यांची काळजी करणारी,काहीही असो जीवनात पहिल्यांदा घरच्यांचा विचार करणारी,आणि ही काळजी कोणालाही न दाखवनारी. तिचा खरा स्वभाव कधी कोणी ओळखला नव्हताच,तिला ओळखायला वेळ लागायचा. तिच्या ओळखीतल्या कोणाला तिचा स्वभाव विचारला तर एकच उत्तर असायचं, ती खूप स्वार्थी आणि दगड काळजाची आहे आणि हे ती जाणून होती ,तिला कधी कोण काय बोलतंय ह्याचा फरकच पडत नसे.तुम्हाला जशी मी वाटतिये तशीच मी. दहावी झाली आणि अकरावी ला कॉलेज बदललं, त्यामुळे ओळख आधीही नव्हती आणि जी होती ती पण नाही राहिली. त्याच्या पाहुण्याच्या गाव म्हणजे हीच गाव. पण गावात असूनही नसल्यागत ती ,तिला माणसांच्या गर्दीत कधीच छान वाटलं नाही, ती तिच्या विश्वात रमणारी होती. घरचे संस्कार आणि आदरयुक्त भीती त्यामुळे कधी मुलांबर न बोलणारी.तिला पहिल्यांदा असा मित्र भेटला होता. त्याची मैत्री अगदी स्वच्छ, निखळ त्याला तिचा स्वभाव माहीत होता. त्याच्याशी मैत्री करतानाच तिने तिचे विचार स्पष्ट मांडले होते. ती नेहमी सांगायची की मी स्वार्थी आहे आणि फक्त आणि फक्त माझाच विचार करते.पण ती विचार करायची दुसऱ्याच्या मनाचा, तिच्या घरच्यांचा आणि त्यांच्या इज्जतीचा, तिचे विचार जरी डोक्याने असले तरी योग्य असायचे. तिचे वडील हे गावातील जाणते व्यक्तिमत्व, गावातील जेष्ठ मंडळी पण त्यांचा सल्ला मागायला यायचे. त्यांच्या धंद्या मुले गावच्या बाहेरही त्याची खूप ओळख होती. गावातील लहान मुलांपासून ते जेष्ठ व्यक्तीपर्यंत सारे त्यांचे सल्ले ऐकायचे. गावातील तंटे असो, प्रेम विवाह वाले प्रकरण असो सारा काही नीट नेटक सोडवणारे. त्यांचे सल्ले ते त्याच्या मुलींना पण सांगत. मुलींच्या भावना खूपच समजून घेतली असा नाही पण त्यांना काय योग्य आहे ते समजून सांगणारे. त्यांच्या एक एक वाक्यात एवढा काही मार्मिक असायच की त्यांचे सल्ले नकळत आत्मसात होयचे. त्यात त्यांच्या संस्कारांची आणि आदरयुक्त भीतीची पण भर होतीच. पण म्हणतात न कॉलेज च वार लागल की सारा काही बदलत, तस सारा काही बदलत गेलं. आयुष्यात मोबाईल नावाचा सवंगडी आला की सार काही बदलून जात, मग जरा जास्तच मित्र मैत्रिणी होतात,तिचाही तसाच झाल. पदवीच्या शेवटच्या वर्षात तिला तो सवंगडी भेटला आणि त्यात facebook आणि wahtsapp नि पण जागा घेतली. आणि तोंड ओळख असलेल्या व्यक्ती पण मित्र मैत्रिणी होऊ लागल्या. या गोष्टीमुळे तिला चार दिवसाच्या ओळखीत खूप सारे प्रोपोजल यायला लागले. पण तिच मत होतं की मुलं काय साऱ्यांनाच प्रोपोज करतात. लोक म्हणतात प्रेमात पडायला एक क्षण पुरेसा असतो पण तीच मत काही वेगळेच होत प्रेमाबद्दल.तिला वाटायचं मनाने ठरवलं तरच प्रेम होऊ शकत किव्हा आधीच कोणावर खूप प्रेम असेल तर काहीही करायच्या आधी त्या व्यक्तीचा विचार मनात येतो. आणि तिच्या त्या प्रेमाच्या राखण्यात तिचा पूर्ण परिवार बसला होता. आणि त्यांच्या खुशी साठी त्यांच्या मान राखून ठेवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. आणि त्याच कारणाने तिची friend list ही facebook आणि whatsapp पुरती मर्यादित होती. तो पण खुल्या मनाचा होता. मोठ्यांचा आदर करणारा. त्याच्या career वर लक्ष देणारा आणि त्याच्याशी मैत्री करताना तिला खूपच छान वाटलं होतं. दोघांचे विचारही पटायचे. कोणाला भाव ही न देणारा मुलगा तिच्यासाठी 24 तास available असायचा. तीन वर्ष झाले त्यांच्या मैत्रीला. तिचा तो कधी बेस्ट friend झाला हे तीच तिलाच कळलं नाही. जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याला सांगणं, सार सुख दुःख त्याच्याशी वाटून घेणं. त्याच्याशी कॉल वर तासनतास बोलणं. त्याच्याशी chat करणं असाच दिनक्रम चालू असायचा तिचा.तिनं कधी विचारला प्रेम करतोस काय कोणावर तर एकच उत्तर ....प्रेमाला वेळ नाही, मला माझ्या करिअर कडे लक्ष द्यायचं आहे. आई बाबांना गर्व वाटेल असा काहीतरी करायचं आहे. आणि त्याची हीच गोष्ट तिला खूप आवडायची.
दोघांच्या प्रेमाच्या संकल्पना वेगळ्या होत्या आणि त्याबतीत त्याच्या गोष्टी ठरलेल्या होत्या. पण देवाला काय वेगळाच मनात होत. म्हणतात ना की एक मुलगा आणि एक मुलगी कधीही मित्र राहू शकत नाहीत, कोणीतरी एक प्रेमात पडतोच. आणि ह्याच्या बाबतीत पण हेच झाल आणि ह्याच्या नात्याला नवीन वळण लागलं. तो तिच्या प्रेमात पडला. एवढ प्रेम करणारा कोणालाही भेटला तर ती व्यक्ती खूपच नशीबवान म्हणावी. पण तिच्या मनात नव्हतं प्रेम तिला नव्हतं बनायचं नशीबवान तिला तर फक्त त्याची निखळ मैत्री हवी होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. त्याला वाटायचं की कधीतरी ती दुसऱ्याची होईल,त्याची न राहील. प्रेम म्हणलं की जळण आलाच आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याने तिला प्रोपोज केलं. तिला काय सांगावे काहीच कळत नव्हतं, तिला मैत्री खूप प्रिय होती म्हणून तिने विचार करायला वेळ मागितला, विचारही केला. पण मनात प्रेम नसताना ती कशी करू शकली असती त्याच्यावर प्रेम.ती फक्त आणि फक्त मैत्रीचा विचार करत होती, आणि तिला साथ द्यायची हिम्मत ही नव्हती एक प्रियकर म्हणून.प्रेमाच्या भावना नसताना ती साथ तरी कशी देऊ शकली असती. त्याच्या बोलण्यात झालेल्या बदलामुळे, त्याच्या वाटत असलेल्या काळजी मुले आणि घरातल्यांच्या वाटणाऱ्या आदरयुक्त भीतीने तिनं त्याच्याशी बोलणं बंद केलं. पण बोलणं बंद केल असल तरी त्याचा अर्थ तिची तिची मैत्री तुटली अशी नव्हती. त्याची काळजी सुटली नव्हती.ती फक्त ह्या विचारात होती की तिची सवय सुटली तर तो त्याच्या भविष्या वर लक्ष केंद्रित करेल. त्याच्या आई बाबांचा विचार करेल. ती मैत्री तोडताना चुकीची असली तरी त्यामागे खूप छुपे विचार होते,त्याची काळजी होती. तिनं नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सांगितलं की बोलणं कमी करेन,सोसिएल मीडिया कमी वापरेन, पण तिला कळलंच नाही की तिचा संकल्प फक्त बोलण्यापूरता होता. तीच ऑनलाइन असणं त्याला त्रास देईल ,तिचा dp आणि स्टेटस त्याला एवढा त्रास देईल. तो जिथं जिथं तिला भेटला, तिच्याशी बोलला ह्या गोष्टी त्याला त्रास देतील. ती खरच ह्या गोष्टी पासून खूप दूर होती, त्याच्या त्रासाची तिला कल्पनाच नव्हती. पण जीवनात असे प्रसंग येतात की आपल्याला त्या व्यक्तीची अचानक काळजी वाटायला लागते, कशातच मन लागत नाही, हिला ही तसच झालं, आणि तिला कळालं की तो खूप झुरतोय तिच्या साठी, त्याची काळजी खूपच वाटू लागली, त्याला समजावू वाटलं की झुरु नको माझ्यासाठी, तुझी काळजी घे, लक्ष दे स्वतःकडे, हसायला शिक पण तिला कळलंच नाही की तीच बोलणं त्याला फक्त आणि फक्त वरवरची काळजी वाटेल, तिची मैत्री फक्त टाइमपास वाटेल, तीच हे सांगणं की प्रेम नाही पण मैत्रीत साथ देईन मरेपर्यंत हे फक्त चुकीचं विधान वाटेल. त्याला वाटलं की तीच बोलणं फक्त त्याची समजूत काढण्यासाठीच आहे,आणि ह्या गैरसमजुती मुळे एका नात्याने दोन वेगळी वळणं घेतली आणि दोन वाटांनी दोन काळजी करणारे लोक वेगळं झाले कायमचे,एकाच्या काळजीच नाव मैत्री तर दुसऱ्याच्या काळजीच नाव प्रेम.

0 Comments