वाचा रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची यशस्वी प्रेमकहाणी आणि लग्न...

रितेशने १६ वर्षांपूर्वी “तुझे मेरी कसम” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विनोदी चित्रपटात रितेशने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने मस्ती, क्या कूल है हम, मालामाल विकली, हे बेबी आणि हाऊसफुल सारख्य चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूडमध्ये त्याची गणना “फॅमिली मॅन” अशी केली जाते. तर मित्रांनो मराठी लव्ह स्टोरीजवर आज आपण रितेश आणि जेनेलिया यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. रितेश आणि जेनेलिया “तुझी मेरी कसम” या चित्रपटाच्या शूटिंगवेळी हैद्राबाद विमानतळावर पहिल्यांदा भेटले होते. रितेशला आधीच सांगण्यात आले होते की चित्रपटाची हिरॉईन त्याची वाट पाहत आहे, परंतु रितेश जेव्हा विमानतळावर उतरला तेव्हा जेनेलियाचे वागणे पाहून त्याला आश्चर्यच वाटले. जेनेलियाला रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. जेनेलियाला वाटले की त्याला भरपूर अहंकार असेल. त्यामुळे रितेश देशमुखने भाव खायच्या आधी आपणच त्याला भाव द्यायला नको असा तिने विचार केला.
रितेशने आल्याआल्या जेनेलियाशी हॅन्डशेक केला. त्यानंतर जेनेलिया हातांची घडी घालून इकडेतिकडे बघायला लागली. पहिल्या भेटीतच जेनेलियाने असा भाव खाणे रितेशला आवडले नाही. पण जेंव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले तेंव्हा जेनेलियाला खात्री पटली की रितेश खरोखरच स्वभावाने चांगला आहे. त्यानंतर दोघांमध्ये मैत्र झाली. सेटवर २४ वर्षांचा रितेश १६ वर्षांच्या जेनेलियामध्ये खूप गप्पा चालायच्या. शूटिंग संपल्यानंतर दोघे जेंव्हा आपापल्या घरी गेले तेंव्हा त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागली. रितेश आणि जेनेलियाला एकमेकांच्या मैत्रीची इतकी सवय झाली होती की ते प्रेमात कधी पडले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. पहिल्या चित्रपटापासूनच सुरु झालेले त्यांच्यातील नाते त्यांनी बाहेर कळू दिले नाही. त्यांच्या मते त्यांच्यातील नात्याचे सौंदर्य हेच होते की त्यांना एकमेकांच्या प्रेमात गुंतण्यासाठी कधीही महागड्या भेटवस्तू किंवा कॅण्डल लाईट डिनरची आवश्यकता पडली नाही. अखेरीस दहा वर्षांच्या मैत्रीनंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या विवाह सोहळ्याला लातूरच काय अवघी चित्रपटसृष्टी आणि देशातील राजकारणीही हजर होते २०१४ मध्ये त्यांना रियान नावाचा मुलगा झाला तर २०१६ मध्ये दुसरा मुलगा झाला ज्याच नाव त्यांनी राहील ठेवलं.

Post a Comment

0 Comments