नमस्कार मित्रांनो मराठी लव्ह स्टोरीजच्या आजच्या आर्टिकल मध्ये आपण ड्रामा क्वीन राखी सावंत विषयी वाचणार आहोत. नवरा मीडियापासून दूर रहाण्याच पसंत करतो असं कारण देत राखीनं नेहमीच त्याचा फोटो शेअर करणे टाळलं आहे. ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहतेच. मागच्या संपूर्ण वर्षात राखी सावंत तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे प्रचंड चर्चेत राहिली. तिनं अद्याप तिच्या पतीचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. त्यामुळे अनेकांना तिच्या लग्नाच्या वृत्तावर अजिबात विश्वास बसलेला नाही. पण आता मात्र 8 महिन्यांनंतर लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवरा मीडियापासून दूर राहणंच पसंत करतो असं कारण देत राखीनं नेहमीच त्याचा फोटो शेअर करणं टाळलं आहे. पण आता तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने नवरीच्या वेशात नवऱ्याचा हात पकडलेला दिसत आहे. मात्र याही फोटोमध्ये तिच्या नवऱ्याचा चेहरा दिसत नाही तिनं चालाखीनं त्याचा चेहरा लपवला आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, 'माझ्या लग्नाचा फोटो' हा फोटो पाहिल्यावर युजर्सनी पुन्हा एकदा तिच्याकडे पतीचा फोटो दाखवण्याची मागणी केली आहे.
राखी सावंतनं मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आपलं लग्न झालं असल्याचा खुलासा केला होता. एका एनआरआय चाहत्यासोबत अत्यंत खासगी समारंभात आपण लग्न केल्याचं राखीचं म्हणणं होतं. माझा नवरा नेहमीच मीडियापासून दूर राहणं पसंत करतो असं तिनं यावेळी म्हटलं होतं त्यामुळे त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही असं कारणही यावेळी राखीनं दिलं होतं. याबाबत स्पॉटबॉय-ईनं एक वृत्त दिलं होतं ज्यात त्यांनी 28 जुलै 2019 ला राखीनं लग्न केल्याची शक्यता वर्तवली होती. लग्नानंतर ती अनेकदा मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर अशा वेशात दिसली होती. याशिवाय तिनं तिचा नवरा युरोपमध्ये राहत असल्याचा दावा केला होता. एवढंच नाही तर बॉलिवूड सोडून लवकरच युरोपला शिफ्ट होणार असल्याचंही तिनं म्हटलं होतं. मात्र सध्या लॉकडाऊन असल्यानं अस काही करणं शक्य नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लग्नाच्या या फोटोमुळे राखी सावंत पुन्हा चर्चेत आली आहे.

0 Comments