बॉलीवूड चित्रपटामध्ये आपण नेहमी पाहिले आहे की दोन प्रेम करणारे आपले प्रेम मिळवण्यासाठी कुठलीही हद्द पार करू शकतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की काही बॉलिवूड अभिनेत्री या रियल लाइफ सुद्धा चित्रपटा प्रमाणेच समजतात आणि आपले प्रेम मिळवण्यासाठी त्यांनी आपला धर्म सुद्धा बदलला. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात की त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी की प्रेम मिळवण्यासाठी आपला स्वतःचा धर्म बदलला.
१. आयशा टाकिया:
आयशा टाकिया हिचा जन्म मुंबई मध्ये एका हिंदू कुटुंबात झाला होता. तिचे वडील हे गुजराती हिंदू होते तर आई या मुस्लिम होत्या. आयशा ने आपल्या कारकिर्दीची सुरवात वयाच्या १५ व्या वर्षी “I am a Complan Boy! I’m a Complan Girl!” या जाहिराती मधून केली होती. बॉलीवूड मध्ये एकेकाळी सर्वात क्युट आणि हॉट लुकिंग असणारी आयशा टाकिया ने आपला जास्त काळ बॉयफ्रेंड असणाऱ्या फरहान सोबत लग्न करण्यासाठी आपला हिंदू धर्म बदलून तिने इस्लाम धर्म स्वीकारला. एवढेच नाही तर तिने लग्नानंतर चित्रपटामध्ये काम करणेही सोडून दिले त्या दोघांचा पूर्णपणे निकाह झालेला होता. आयशा टाकिया हिने सलमान खान सोबत वॉन्टेड या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे.
२. अमृता सिंग:
अमृता सिंग ने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात बेताब या चित्रपटापासून केली होती. या चित्रपटामध्ये तिचा नायक हा सनी देओल होता. हा चित्रपट खूप सुपर हिट झाला होता. अमृता सिंग शीख धर्माची होती आणि तिला प्रेम झाले ते एका मुस्लिम परिवारात जन्मलेल्या सैफ अली खान सोबत. विशेष म्हणजे अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्या वयामध्ये तब्बल १२ वर्षाचे अंतर होते. अमृता सिंग ने कुठलाही विचार न करता इस्लाम धर्म स्वीकारला परंतु अमृता सिंग आणि सैफ अली खान या दोघांच्या लग्नामुळे सैफ अली खानचे आई वडील खुश नव्हते, परंतु त्या दोघांनी कोणाचे ऐकले नाही आणि लग्न केले. अमृता सिंग याना सैफ अली खान यांच्यापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले पण आहेत. परंतु काही दिवसानंतर हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले.
३. धर्मेंद्र आणि हेमामालिनी:
हेमा मालिनीला आपली धर्मपत्नी बनविण्यासाठी धर्मेंद्रने आपल्या पहिल्या पत्नीकडून तलाक घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीने तलाक देण्याचे नाकारले तेव्हा धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी पळून जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला आणि नंतर लग्न केले. या दोघांना इशा देओल आणि अहाना देओल अशा दोन मुली आहेत.
४. शर्मिला टागोर:
शर्मिला टागोर या जुन्या काळातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. शर्मिला टागोर यांनी स्वतः इस्लाम धर्म स्वीकारला होता. जेव्हा त्यांचे लग्न क्रिकेटर मन्सूर अली खान पटोदी सोबत झाले होते. शर्मिला टागोर यांचे नाव बदलून नंतर बेगम आयेशा सुलताना खान असे ठेवण्यात आले होते. शर्मिला टागोर यांना सैफ अली खान आणि सोहा अली खान अशी दोन मुले आहेत. त्या सैफ अली खान हा बॉलीवूड मधील आघाडीचा अभिनेता आहे.
५. हेजल कीच:
हेजल कीच हिने आपला धर्म बदलून शीख धर्म स्वीकारला होता. कारण सुपरस्टार क्रिकेटर युवराज सिंग यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्म बदलल्यानंतर हेजल कीच चे नाव गुल बसंत कोर असे ठेवले होते. हेजल कीच हिने सलमान खान सोबत बॉडीगार्ड या सुपरहिट हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे.
६. नर्गिस दत्त:
नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी ही एका परिकथे पेक्षाही कमी नाही. Mother India या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांना एकमेकांसोबत प्रेम झाले. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्या आई ची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुनील दत्त यांनी नर्गिस यांना आगी पासून वाचवले होते. नर्गिस या इस्लाम धर्मीय होत्या त्यांनी सुनील दत्त सोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. नर्गिस आणि सुनील दत्त यांना संजय दत्त, प्रिया दत्त, नम्रता दत्त, अशी तीन मुले आहेत. त्यांचा मुलगा संजय दत्त हा बॉलीवूड मधील सुपरस्टार आहे.
७. दिव्या भारती:
वयाच्या सोळाव्या वर्षी चित्रपट सृष्टी मध्ये पाऊल ठेवलेल्या दिव्या भारतीने अल्पवधीतच हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवला होता. समकालीन अभिनेत्री जसे माधुरी दीक्षित, श्रीदेवी, रविना टंडन, करिष्मा कपूर यांच्या पेक्षा दिव्या भारती यांची चित्रपट कारकीर्द हि खूप छोटी ठरली. दिव्या भरती यांनी १९९२ ते १९९३ दरम्यान एकूण १४ चित्रपटामध्ये काम केलं आहे. दिव्या भारती यांनी खूपच कमी वयामध्ये डायरेक्टर साजिद नाडियाडवाला सोबत लग्न केले होते आणि तेंव्हा त्यांनी हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. परंतु लग्नाच्या काही दिवसानंतर खूप कमी वयामध्ये त्यांचा अपघाती मृत्य झाला. त्यांनी शोला और शबनम, दिवाना, रंग, अशा चित्रपटामध्ये काम केले आहे. तर मित्रांनो हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच पोस्टला लाईक आणि शेअरही नक्की करा.



0 Comments