बॉलीवूड मध्ये काही नावाजलेल्या अभिनेत्र्या आहेत ज्यांनी विवाहीत पुरूषांसोबत दुसरे लग्न केले आहेत. तर पाहुयात कोण आहेत या अभिनेत्र्या.
करिना कपूर खान:
बॉलिवूडची बेबी, ए-लिस्ट अभिनेत्री करिना कपूर ही 2012 साली विवाह बंधनात अडकली. तिने प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. करिना आधी अमृता सिंग या बॉलीवूड अभिनेत्रीसोबत सैफ विवाहबंधनात अडकला होता. अमृता आणि सैफला सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुले आहे. 13 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2004 ला ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर करिना आणि सैफ एकमेकांना डेट करू लागले आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता करिना आणि सैफ ला तैमुर नावाचा लहान मुलगा आहे.
शिल्पा शेट्टी:
फिटनेस क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टी 2009 साली बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या सोबत विवाहबंधनात अडकली. मात्र, शिल्पाच्या आधी राज यांनी कविता यांच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन मुल होते. मात्र, राज यांच्या सोबत कविता यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही आणि त्यानंतर त्यांनी अभिनेत्री शिल्पा हिच्याशी लग्न केले. लग्ना अगोदर 2 वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.
राणी मुखर्जी:
लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी ही 21 एप्रिल 2014 साली फिल्म मेकर आदित्य चोप्रा यांच्याशी विवाह बंधनात अडकली. या विवाहबद्दल बरीच गोपनीयता पाळण्यात आली होती. राणीशी लग्न करण्याआधी आदित्य यांनी पायल खन्ना सोबत विवाह केला त्यांचा संसार फारकाळ टिकू शकला नाही आणि त्यांनी आठ वर्षानंतर घटस्फोट घेतला. त्यानंतर आदित्य यांनी राणी हिच्या सोबत लग्न केले.
करिष्मा कपूर:
बॉलिवूडमध्ये आपले नाव गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर हिने आपल्या करिअरच्या यशाच्या शिखरावर असताना 2003 साली इंडस्ट्रीयलिस्ट संजय कपूर यांच्या सोबत विवाह केला. करिष्मा हे पहिले लग्न होते तर संजय यांचे हेस दुसरे लग्न होते. करिष्मा आणि संजय यांन समायरा आणि कियान असे दोन मुले आहे. मात्र, करिष्मा आणि संजय यांचा संसार फारकाळ टिकला नाही आणि अखेर 2010 साली ते दोघे वेगळे झाले.
रविना टंडन:
अभिनेत्री रविना टंडन डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी यांच्यासोबत 2004 साली लग्नबंधनात अडकली. राजस्थानच्या उदयपुरमध्ये या दोघांचा लग्न सोहळा रंगला. रविनाच्या आधी अनिल यांचे लग्न नताशा सिप्पी यांच्यासोबत झाला होता. पण त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. रविना आणि अनिल यांना मुलगी राशा आणि मुलगा रणबीर वर्धन ही अपत्य आहेत.
हेमा मालिनी:
बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून अभिनेत्री हेमा मालिनी यांना सर्वत्र ओळखले जाते. हेमा मालिनी यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले तेव्हा ते विवाहित होते. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर होत्या, त्यापासून सनी, बॉबी, विजीता आणि अजिता देओल असे चार मुल आहेत. त्यानंतर ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले व पहिल्या पत्नीपासून घडस्फोट न घेता त्यांनी हेमा यांच्याशी विवाह केला होता. मात्र, हेमा यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी आपला धर्म बदलून इस्लाम धर्म कबूल केला आणि 1980 साली त्यांनी हेमाजींशी लग्न केले.



0 Comments